भुसावळ बाजारपेठ डीबी शाखेची कामगिरी
भुसावळ : पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयीत असलेल्या व तब्बल दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणार्या इराणीस बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने अटक केली. अफसरअली रियासतअली असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, नाईक शंकर पाटील, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, प्रेमचंद सपकाळे, किरण बाविस्कर आदींनी ही कारवाई केली.