पोलिसांसमोर उद्योजकांनी वाचला समस्यांचा पाढा!

0

जळगाव । औद्योगिक वसाहतीत एका फुड कंपनीत सोमवारी सकाळी अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या प्रमुख उपस्थित पोलीस-उद्योजक समन्वय बैठक झाली. या बैठकीत दालमिलमधून होणारी दाळची चोरी, रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद, कंपन्यांच्या बाहेर उभ्या ट्रकचा अडथळा, पानटपर्‍यांवर होणारी दारुची विक्री तसेच भुरट्या चोर्‍या यासारख्या समस्यांचा पाढा उद्योजकांनी पोलिसांसमोर वाचला. तर या घटनांना आळ बसण्यासाठी पोलिस अधीकारी व कर्मचार्‍यांनी अधून-मधून कंपन्यांना भेट द्याव्यात हेच नव्हे तर एमआयडसीसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन असावे अशा मागण्या उद्योजकांनी पोलीस-उद्योजक समन्वय बैठकीत केल्या.

बैठकीत उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, जिंदाचे अध्यक्ष भुवनेश्वर सिंग यांच्यासह प्लास्टीक, फूड, चटई, दालमील व केमिकल्स उद्योजक उपस्थित होते. यानंतर औद्योगिक वसाहतीत लहान मोठे 1200 उद्योग असून एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत या उद्योगांसह ग्रामीण व शहरी भाग आहे. 50 टक्के भाग झोपडपट्टी व त्यात सातत्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, त्यात अपुर्‍या मनुष्यबळामुळे पोलिसांची कसरत होते. या सार्‍या अडचणींमुळे पोलिसांना औद्योगिक वसाहतीत पुरेसा वेळ देता येत नाही, त्याचाच फायदा भुरटे चोरटे, टपजयांवर दारु विक्री करणारे व कंपन्यांमधील चोरटे घेतात. या समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन असावे अशी मागणी जिंदाचे अध्यक्ष भुवनेश्वर सिंग यांनी केली.

डाळ चोरीचे प्रमाण वाढले
गेल्या काही दिवसांपासून दालमिलमधून डाळ चोरीचे प्रमाण वाढले असून बहुतांश दालमिलमधील कामगार सुप्रिम कॉलनीमधील आहे. दाळ चोरी झाल्यानंतर सुप्रिम कॉलनीत ठिकठिकाणी डाळ सुकविण्यासाठी बाहेर टाकलेली दिसून येते. ही चोरीच दाळ असल्याची शक्यता उद्योजकांनी बैठकीत व्यक्त केली.

अवैध धंदे बंद करणार
उद्योजकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी टपरीवरील दारु व भुरट्या चोजया रोखण्यासाठी धाडसत्र राबविले जाईल. जे विषय पोलिसांच्या अख्त्यारीत नाहीत, परंतु तरीही संबंधित यंत्रणांशी बोलून या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी उद्योजकांनीही न फुटणारे पंच द्यावेत असे आवाहन सांगळे यांनी केले. त्याचबरोबर प्रत्येक कंपनीत गणवेशातील पोलीस भेटी देतील असेही त्यांकामगार व सुरक्षा रक्षकांची माहिती ठेवा. तर अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी कंपनीत काम करणार्‍या प्रत्येक कामगार व सुरक्षा रक्षकाची चारीत्र्य पडताळणी करावी, उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आदी सूचना दिल्या.