नागोठणे : मोटारसायकल घसरून अपघात होवू नये यासाठी येथील पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या वाहतूक शाखेच्या एका कर्मचार्यांने स्वतः फावडे हातात घेऊन रस्त्यावरील खडी दूर करीत कार्यतत्परता दाखविल्याने पोलिसामध्ये सुद्धा माणुसकी असते हे सिद्ध झाले आहे. दीपक चव्हाण असे या कर्मचार्यांचे नाव आहे.