पोलिसाची गळा चिरून हत्या

0

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये असलेल्या बालावाली पोलीस ठाण्यात उप निरीक्षक म्हणून शहजोर सिंह यांची काही समाजकंटकांनी त्यांची गळा चिरून हत्या केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये पोलीस अधिकार्‍याची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच तशीच घटना घडल्याचेही स्पष्ट होत आहे. बालावली पोलीस ठाण्यात सिंह हे गेल्या अनेक दिवसांपासून कार्यरत होते. एका बंद पडलेल्या काचेच्या फॅक्ट्रीजवळ त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याचीही माहितीही मिळते आहे. शहजोर सिंह यांच्या मृतदेहावर अनेक जखमा आहेत. तसेच त्यांची बोटांवर कापण्याच्या खुणा आहेत. एका प्रत्यक्षदर्शीने एक मृतदेह शेतात पडला आहे अशी माहिती पोलिसांना दिल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. शहजोर सिंह यांच्या मृतदेहावर अनेक जखमा आहेत.