मुंबई । लेखीका शोभा डे यांच्या वादग्रस्त टिपणीमुळे चर्चेत आलेल्या मध्यप्रदेश पोलिसातील पोलिस निरिक्शक दौलतराम जोगावत यांना जाडेपणाच्या आजारावर दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जोगावत यांच्या आजारावर उपचार करण्यासाठी मुंबईतील ख्यातनाम डॉ. मुफज्जल लकडावाला यांच्या सेंटर फॉर ओबेसिटी अॅण्ड डायजेस्टीव्ह सर्जरी रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात रुग्णालयाच्या प्रतिनिधीने मध्यप्रदेश पोलिसांच्या वरिष्ठ पदाधिकार्यांची भेट घेतली आहे.
मुंबईत चाचण्या करून उपचाराबाबत ठरवू
मुंबई महापलिकेच्या निवडणूकीच्यावेळीस बंदोबस्तासाठी असलेल्या दौलतराम जोगावत यांचा फोटो ट्विट करुन मुंबई पोलिसांचा हेवी बंदोबस्त अशी ट्विटरवर टिपण्णी केली होती. डे यांनी ट्विट केलेल्या फोटोतील पोलिस मुंबई पोलिसांचा नसून मध्यप्रदेशचा आहे. त्यात अती खाण्यामुळे नव्हे तर आजारपणामुळे दौलतराम यांचे वजन वाढल्याचे स्पष्ट झाल्यावर देशातील प्रसिद्धी माध्यमाांनी दौलतराम यांची बाजू लावून धरली होती. दौलतराम यांच्यावर उपचार करण्यसाठी पुढाकार घेणार्या रुग्णालयाचे व्यवस्थापक फ्लॉयड डिसोझा यांनी नीमच येथे अतिरीक्त पोलिस अधिक्शक राकेश सगर यांची भेट घेऊन दौलतराम यांच्या आजाराविषयी माहिती घेतली. डिसोझा म्हणाले की मुंबईतील रुग्णालयात दौलतराम यांच्या निरनिराळ्या चाचण्या घेतल्या जातील. त्यांनतर दौलतराम यांच्या आजारावर औषधपचार करायचे की शस्त्रक्रिया करायची याचा निर्णय डॉक्टर घेतील.
दौलतराम यांनी समाधान व्यक्त केले
आजारावर उपचार होणार असल्यामुळे दौलतराम यांनी समाधान व्यक्त केले. दौलतराम म्हणाले की मी तंदुरस्त किंवा फिट झालो तर आनंदच होईल. दरम्यान मध्यप्रदेश पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकार्यानेही इंदूर येथील अरविंदो रुग्णालयात दौलतराम यांच्या आजारावर मोफत उपचार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.पोलिस अधिक्शक मनोजकुमार सिंग म्हणाले की राज्य सरकारचे पोलिस वेलफेयर बोर्ड आहे. त्याठिकाणी शासनामार्फत उपचार करण्याची तरतूद आहे. दौलतराम यांना उपचारासाठी पैशांची आवश्यकता भासल्यास पोलिस वेलफेअर बोर्डच्या माध्यमातून मदत दिली जाईल.
12 दिवसांमध्ये तीचे वजन 50 किलो कमी
दरम्यान बेरिएट्रिक सर्जरीसाठी थेट इजिप्तहून थेट मुंबईत आलेल्या 500 किलोवजनाच्या इमान अहमदने डॉ. लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या उपाचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सध्या इमानवर फिजीओथेरीपीस्ट आणि आहारतद्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु असून 12 दिवसांमध्ये तीचे वजन 50 किलोने कमी करण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे.