जळगाव प्रतिनिधी। स्वाक्षरी घेण्याच्या बहाण्याने घरात घुसून पोलिसाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार या महिलेचा पती फर्निचरच्या दुकानावर कामाला आहे. तर महिला गृहिणी असून तिला दोन अपत्ये आहेत. आज पीडित महिला घरी एकटी असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोलिसाने महिलेने २० ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीसंदर्भात कागदावर स्वाक्षरी घ्यावयाची आहे, असे सांगत घरात प्रवेश केला. नंतर तिच्याशी अश्लिल तसेच असभ्य वर्तन केले. सायंकाळी कामावरून पती घरी परतल्यानंतर तिने घडलेल्या प्रकाराची माहिती कानावर टाकली. घरात येऊन पोलिसाने पत्नीचा विनयभंग केल्याचा मामला कळाल्यानंतर पत्नीस सोबत घेत दोघे जणांनी विश्वकर्मा सेना संघटनेचे राजेंद्र निकम यांची भेट घेत प्रकार कथन केला. पोलीस निरीक्षक बी.जे. रोहोम यांनी संबंधीत कर्मचार्यास समोर हजर करून यासंदर्भात विचारणा केली असता कर्मचार्याने क्षमायाचना केली. दरम्यान, या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.