पोलिसाला आत्महत्त्येस प्रवृत्त करणार्‍या महिलेस अटक

0

जळगाव : बीड येथिल पोलिस कॉन्स्टेबल दिलीप प्रकाश केंद्रे (वय 34) यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (17 डिसेंबर) घडली. केंद्रे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या जळगावातील पिंप्राळा हुडको येथिल महिलेस बीड पोलिसांनी बुधवारी जळगावातून ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसांचे पथक बीडकडे रवाना झाले.

केंद्रेच्या पत्नी अनिता यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जळगावातील या महीलेविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर बुधवारी सकाळीच बीड येथील पोलिसांचे पथक जळगावात दाखल झाले होते. त्यांनी पिंप्राळा हुडको परिसरातून या महीलेस ताब्यात घेतले. तशी नोंद रामानंदनगर पोलिस ठाण्यात केली आहे. दुपारी दोन वाजता हे पथक पुजा पाटील हीला घेऊन बीडकडे रवाना झाले.

सन 2010 मध्ये दिलीप केंद्रे पोलिस दलता भरती झाले होते. तर वर्षभरापूर्वीच रामानंदनगर पोलिस ठाण्यातून बदली होऊन बीड येथे गेले होते. रामानंदनगर पोलिस ठाण्यात असताना पुजा पाटील नामक महिलेने त्यांच्याशी संपर्क केला. यानंतर विविध कारणांवरुन पुजा ही केंद्रे याला ब्लॅकमेल करीत होती. तीच्या त्रासाला कंटाळुन अखेर दिलीप केंद्रे यांनी बीड येथे आत्महत्या केली. केंद्रे यांच्या खिशात आढळुन आलेल्या सुसाईट नोटमधून हा संपुर्ण उलगडा
झाला आहे.