पोलिसाला हॉटेलात मारहाण

0

नवापूर । चहा पिण्यासाठी आलेल्या पोलिसाला हॉटेल मालकाने मारहाण केल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे घडली आहे. तालुक्यातील चिंचपाडा आऊट पोस्ट पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल नरेंद्र जगदाळे यांना या घटनेत मारहाण झाली आहे. हॉटेल मालक याचा मुलगा आदर्श उर्फ गोल्डी पप्पू जयस्वाल याने फिर्यादी यांच्यासोबत हुज्जत घालून वाद केला. पप्पु जयस्वाल व त्याचा पुतण्या निर्भय देवी प्रसाद जयस्वाल याने व त्याचा साथीदाराने फिर्यादी पोलीस कर्मचारीला पकडून धरून दगडाने व पोलीस कर्मचारीचा गाडीस बांधलेल्या काठीने कपाळावर व तोंडावर मानेवर हातावर पायावर पाठीवर पोटावर जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.तालुक्यातील चिंचपाडा आऊट पोस्ट पोलिस ठाण्यातील पो.का.जगदाळे रात्री मोटरसायकलवरून पेट्रोलिंग करताना हॉटेल मनोहर मध्ये रात्री अकरा वाजता चहा पिण्यासाठी व जेवण घेण्यासाठी गेले असता हॉटेल मालक यांच्याशी वाद झाला.त्यात जगदाळे यांना जबर मारहाण केली त्यात गंभीर जखमी झाले असून नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल
नवापूर मुख्य पोलिस ठाण्यात फोन करून त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली.शेवटी पोलिसांनी रक्तरंजित अवस्थेत नरेंद्र जगदाळे यांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले हॉटेल मनोहरचे मालक शारदाप्रसाद उर्फ पप्पूशेठ मनोहर जयस्वाल(47)व मुलगा गोल्टी उर्फ आदर्श शारदा प्रसाद जयस्वाल(23),पुतण्या निर्भय उर्फ लकी देवी प्रसाद जयस्वाल(23)यांच्यावर नवापूर पोलिस ठाण्यात आरोपीविरूध्द भा.द.वि.कलम 160/2017 307,353,332 333,427,143,147,148,149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. पुढील तपास पो नि विजयसिंह राजपूत यांचा मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, पो का साहेबराव खांडेकर करीत आहे.

डबा घेण्यासाठी हॉटेलमध्ये
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हेड कॉन्स्टेबल नरेंद्र जगदाळे रात्री चिंचपाडा गावातील नागपूर-सुरत महामार्गावर गस्त घालत होते.यादरम्यान ते हॉटेल मनोहरमध्ये चहा पिण्यासाठी आणि रात्रीच्या जेवणाचा डबा घेण्यासाठी गेले होते.हेड कॉन्स्टेबल नरेंद्र यांनी चिकनची पिशवी घेऊन आपल्या मोटरसायकलाच्या हॅन्डलला लावली तेवढ्यात एका कुत्र्याने त्यांच्या मोटरसायकलवरील चिकनची पिशवी पळवनू नेली.पिशवीचा शोध घेण्यासाठी नरेंद्र जगदाळे पुढे निघून जातात.मात्र,हॉटेल मालकाला वाटते की,नरेंद्र हे पैसे न देता निघून जात आहेत.त्यामुळे ते हेड कॉन्स्टेबल नरेंद्र यांना याविषयी बोलले.त्यामुळे दोघांचीही बाचाबाची झाली.हेड कॉन्स्टेबल नरेंद्र हॉटेल मालकाला दुसरी भाजी देण्याचे सांगतात.मात्र जोपर्यंत पहिल्या भाजीचे पैसे मिळत नाही. तोपर्यंत दुसरी भाजी देणार नाही,असे हॉटेल मालकानी सांगितले.

पोलीस ड्रेसवर आल्यास धंद्यावर परिणाम
दोघांमध्येही वाद वाढतच गेला व त्याचे रुपांतर हाणामारीत झाले .यावेळी हॉटेल मालकासह पाच जणांनी ऑन ड्युटी असलेल्या हेड कॉन्स्टेबल नरेंद्र यांना लाठीने बेदम मारहाण केली. रात्रीच्या वेळी हॉटेलवर पोलिस ड्रेसवर येऊ नका. आमचे ग्राहक घाबरतात.काही ग्राहक हॉटेल मध्ये येत नाही.धंद्यावर परिणाम होतो.अशी बातचीत पोलिस व हॉटेल मालक यांच्यात रात्रीच्या दरम्यान झाली अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी सांगितली आहे.तर हॉटेल मालकाने पोलीसांवर शिवीगाळ व दमबाजीकरून रात्री हॉटेलवर धिंगाणा घातला,असा आरोप केला आहे.जगदाळे यांना मारहाण चालु असताना त्यांनी कशीबशी सुटका करुन घेत, चिंचपाडा पोलीस स्टेशन गाठले.