विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरींग दोरजे यांनी घेतली बैठक ; सण, उत्सवांच्या काळात अनुचित प्रकार न घडल्याने कौतुकही केले
जळगाव : पोलीस शिपाई ते पोलीस अधीक्षकपदापर्यंत आपली कर्तव्य व जबाबदारी काय आहे, आपण काय व कसे काम करतो, ते कसे केले पाहिजे, या शब्दात विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरींग दोरजे यांनी अधीक्षकांसह अधिकार्यांना खर्या पोलिसिंगबाबत डोस पाजले. तसेच त्यांनी प्रत्येकाला कर्तव्याची जाणीव करुन देत असातंना मार्मिक शब्दात कानपिचक्याही देवून अयोध्या निकाल व ईद ए मिलाद या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रंदिवस मेहनत घेतली, त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही, याबाबतही त्यांनी पोलिसांचे कौतुक केले.
पोलिसिंगबाबत बैठकीत मंथन केल
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजे यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकायांची बैठक घेतली. सकाळी 11 ते दुपारी 2 अशी तीन तास ही बैठक चालली. त्यात त्यांनी पोलीस शिपाई, ठाणे अलमदार, बीट अमलदार, प्रभारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांचे कर्तव्य, मूळ काम, जबाबदारी व सामाजिक बांधिलकी काय व आपण काय व कसे काम करतो यावर डॉ.दोरजे यांनी या बैठकीत मंथन केले.
गुन्हे नियंत्रणासाठीही टोचले कान
दाखल असलेले गुन्हे उघडकीस आणणे व गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबतही डॉ.दोरजे यांनी अधिकार्यांचे कान टोचले. निंबोल दरोडा व भुसावळ गोळीबार प्रकरणाची त्यांनी पोलीस अधीक्षकांकडूनच माहिती घेतली. पोलीस स्टेशन व उपविभाग निहाय गुन्ह्यांचा आढावा घेणे मात्र, त्यांनी या बैठकीत टाळले.
आयजींच्या तोंडून पोलिसांचे विशेष कौतुक
संवेदनशील जिल्हा असताना अयोध्या निकाल व ईद ए मिलाद या दोन घटना व उत्सवात कुठेही गालबोट लागले नाही. रात्रंदिवस पोलिसांनी खडा पहारा दिला. याआधी देखील विधानसभा निवडणूक व गणेशोत्सव काळात पोलीस सलग बंदोबस्तावर होते. चोख बंदोबस्त व योग्य नियोजन त्यामुळे जिल्ह्यात शांतता नांदली, याबाबत त्यांनी पोलिसांचे विशेष कौतुक केले.