पोलिस असल्याचे सांगून तोतयांनी वयोवृद्धाकडील 40 हजारांची अंगठी लांबवली
यावल शहरातील धक्कादायक घटना ः दोघा भामट्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
यावल : पोलिस असल्याचे सांगून तोतयांनी वयोवृद्धाकडील 40 हजारांची अंगठी लांबवली. या प्रकरणी यावल पोलिसात दोघा भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून वयोवृद्धांनी सतर्क रहावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
अज्ञातांविरोधात गुन्हा
पाडळसे, ता.यावल येथील दिलीप पुरुषोत्तम बर्हाटे (68) सी गुरूवारी सकाळी दुचाकी (क्रमांक एम.एच.03 ए.पी. 1608) ने भुसावळमार्गे यावल येथे येत असताना यावल शहराजवळील घोडेपीर बाबा दर्गाजवळ पाठीमागून दुचाकीवर दोघे आले. जळगाव येथील पोलिस असल्याचे सांगून तुमच्याकडे गांजा असल्याची माहिती आमच्याकडे असल्याचे सांगत बर्हाटे यांची अंग झडती घेण्यात आली. यावेळी त्यांच्या हातातील 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून भुसावळच्या दिशेने पसार झाले. बर्हाटे यांनी यावल पोलिस ठाणे गाठत आपबिती सांगितली. दोन अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे.