Audacious house burglary at the police station in Shahada ; Thieves made off with 30 live cartridges along with the pistol instead of Rs.1.5 lakh शहादा : चोर्या-घरफोड्या नवीन नाही मात्र शहाद्यात चोरट्यांनी थेट फौजदाराच्या घरातच चोरी करून यंत्रणेला आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी दिड लाखांच्या मुद्देमालासह सर्विस रीव्हॉल्व्हर तसेच 30 जिवंत काडतूस लांबवल्याने पोलिस यंत्रणा पुरती हादरली आहे. चोरट्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक रजेवर असताना चोरी
सारंगखेडा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी यांच्या शहादा येथील दिनदयाळ नगरमधल्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्यांनी एक शासकीय सर्व्हिस रीव्हॉल्व्हर तसेच 30 जिवंत काडतुस यांसह एक लाख 12 हजारांची रोकड तसेच 50 हजार रुपये किंमतीचे दहा ग्रॅम वजनाची सोन्याची लगड असा एकूण एक लाख 62 रुपयांचा ऐवज लांबवला. उपनिरीक्षक कोळी हे पाच दिवस रजेवर होते व घरी परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. पिस्टल व जिवंत काडतुसे चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या धाडसी चोरीमुळे पोलिस यंत्रणेत पुरती खळबळ उडाली असून चोरट्यांचा जिल्ह्यात सर्वत्र शोध सुरू करण्यात आला आहे.