पोलिस ठाण्यावर हल्ला

0

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील पोलिस ठाण्यावर शुक्रवारी दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच पुलवामा येथील तहसील कार्यालयातदेखील ग्रेनेड हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात चार पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. दुपारच्या सुमारास पोलिस स्थानकावर दहशतवाद्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच तहसील कार्यालयातदेखील यावेळी हल्ला करण्यात आला. सकाळपासून पाकिस्तानच्या सैन्यांकडूनदेखील भारतीय सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये हा हल्ला करण्यात आला होता.