संपर्क कार्यालयाचे पोलिस निरीक्षक पळसुले यांच्या हस्ते उद्घाटन
नवीन कार्यकारीणीची झाली निवड
निगडी : – गेल्या 20 वर्षांपासून पोलिस नागरिक मित्र ही संस्था अनेक संस्थेसोबत विविध उपक्रम राबवून समाजसेवा करीत असते. संस्थेच्या कार्याला अधिक बळ देण्याच्या उद्देशाने संपर्क कार्यालयाचे उद्घाटन निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजयकुमार पळसुले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी धनंजय कुलकर्णी, संघटनेचे अध्यक्ष बाबुराव फडतरे, उपाध्यक्ष किरण पाचपांडे, सचिव राहूल श्रीवास्तव, खजीनदार शितल ऐरोडले व सर्व कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या शहरातील वेगवेगळ्या विभागातील सदस्यांना विभागप्रमुख, संपर्क प्रमुख व जुन्या सदस्यांचे रिनिव्हल करण्यात आले.
जुन्या सदयांमुळे संस्था सुरु
संस्थापक अध्यक्ष कै. तुकाराम तनपुरे यांच्या निधनानंतर ही संस्था बिना अध्यक्ष आपले योगदान देत होती. संस्थेच्या आधीच्या महिला प्रमुख ज्योती पवार यांचे निधन झाले होते. ती जागा पण रिकामी होती. उपाध्यक्ष नितीन यादव, सचिव अश्विनी गरूड, खजीनदार धनंजय कुलकर्णी यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामे दिले होते. मात्र अध्यक्ष नसल्याने हे राजीनामे धर्मदाय आयुक्तांकडे पाठविले गेले नाही. एकूण पाच जागा रिक्त झाल्या व कोणीही प्रमुख पदाधिकारी नसल्यामुळे संस्था बंद पडणार, अशी परिस्थिती निर्माण झाली. राहुल श्रीवास्तव या जुन्या कार्यकारीणीतील सदस्यांनी व उरलेल्या सर्व कार्यकारीणीच्या प्रयत्नांमुळे मागील वर्षाचे ऑडिट करून ते धर्मादाय संस्थेला दाखल केले. त्यामुळे संस्था पुन्हा सुरू झाली.
यांची झाली निवड
पोलिस नागरिक मित्र संस्थेच्या अध्यक्षपदी बाबुराव फडतरे, उपाध्यक्षपदी किरण पाचपांडे, सचिवपदी राहुल श्रीवास्तव, खजीनदारपदी शितल ऐरोडले, सदस्यपदी सोना गडदे, बबन सुर्यवंशी, माया गायकवाड, संतोष शिंदे, दिलीप गडदे, भारती भालेकर, मुकेश सिंह, सल्लागारपदी रंगनाथ यलमार, स्मिता डेरे व शोभा देशपांडे तर कायदे सल्लागारपदी अॅड. रमेश महाजन यांची निवड करण्यात आली.
पोलिस निरीक्षक पळसुले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. आमदार महेश लांडगे यांनी फोनवर शुभेच्छा दिल्या व अतिव्यस्ततेमुळे कार्यक्रमाला येवू न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. हे संपर्क कार्यालय हरी ओम औद्योगिक नगर, तळवडे परिसरात असल्याने तेथील नगरसेवक प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, पुर्णिमा सोनवणे यांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरू गणेश शाळेचे प्राचार्य नंदकुमार ठाकुर सरांनी केले. अध्यक्षीय भाषण बाबुराव फडतरे यांनी केले. आभार दिलीप गडदे यांनी मानले.