पोलिस निरिक्षक पवार यांचा सत्कार

0

चोपडा। चोपडा शहर पोलिस स्टेशनला रामकृष्ण पवार सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी साडेतीन वर्षात पारदर्शक कामगिरी करून त्यांची चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला नुकतीच बदली झालेली होती. त्यांनी शहरात जनतेशी चांगले संबंध प्रस्थापित केले असून राज्यात नुकतेच 734 सहाय्यक पोलिस निरीक्षकांना शासनाने पोलिस निरीक्षक या पदावर बढती करण्यात आले. या यादीत 182 क्रमांकार रामकृष्ण पवार यांचे नाव होते.

बढती झाल्यानंतर बुलढाणा येथे जात पडताळणी विभागात बदली झाली आहे. सपोनी रामकृष्ण पवार यांना बढती मिळाल्याने शासकीय विश्राम गृह येथे पवार यांच्या भाजपाचे शहराध्यक्ष नरेद्रं पाटील यांचे हस्ते शाल , श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिवन पाटील, सरचिटणीस नितिन माळी, युवा शहराध्यक्ष तुषार पाठक, नगरसेवक गजेंद्र जयस्वाल, डॉॅ.मयुर अग्रवाल, पंकज पाटील, धिरज सुराणा, ए.आर. काझी, भुषण महाजन, गोपाल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.