पोलिस निरीक्षक संजय सानप, सतीश गोराडे धुळ्यात!

0

धुळे । गृह विभागाचे राज्यातील 267 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांंचे आदेश दिले आहेत. जिल्हा पोलिस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांनी उस्मानाबाद येथे तर नाशिक येथील पोलिस निरीक्षक संजय सानप यांची धुळे येथे बदली झाली आहे.

धुळे तालुका पोलिस ठाण्याचे संभाजी पाटील यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. नाशिक शहरचे पोलिस निरीक्षक संजय सानप यांची धुळे येथे झाली आहे. पोलिस निरीक्षक रामराव सोमवंशी यांची ठाण्याला बदली झाली आहे. नाशिक येथील सुनिल पाटभल यांची महाराष्ट्र पोलिस अकादमीत धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रात नागपूर शहरचे पोलिस निरीक्षक सतीष गोराडे यांची बदली आली आहे. या सर्वांना 15 मे पूर्वी कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे.