पारोळा । येथे पो.पा. संघटनेची बैठक संघटनेचे अध्यक्ष भोलाणे पो.पा. दिनकर पाटील यांचे अध्यक्षतेखाली पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे यांचे मार्गदर्शनाने बहुउद्देशिय हॉल पं.स. पारोळा येथे घेण्यात आली. यावेळी नवनियुक्त पो.नि. एकनाथ पाडळे,गुप्त वार्ता शाखेचे पो.हे.कॉ. प्रताप पाटील, पो.हे.कॉ. बागवान, पं.स. सभापती पांडूरंग पाटील टिटवी, जिल्हा समन्वय समिती सदस्य रामराव पाटील राजवड, मुंदाणे प्र.ऊ.चे मा. सरपंच डी.के. पाटील,किशोर पा.यांचा संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
सदर बैठकीत पो.नि. एकनाथ पाडळे यांनी पो.पा. यांना हक्क,कर्तव्य व जबाबबदारी विषयी बहुमोल मार्गदर्शन केले याबाबत लवकरच तालुका स्तरावर पो.पा.यांचे शिबीर आयोजीत करण्यात येईल. तसेच 16 जून रोजी नवनियुक्त जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराडे हे पारोळा पोलीस स्टेशनला भेट देणार असल्याने पो.पा.यांनी जास्त संख्येने मिटींगसाठी उपस्थित राहण्याचे सांगितले.
बैठकीसाठी तालुक्यातील पो.पा. दिनकर पाटील भोलाणे, अशोक पाटील मुंदाणे, सुकलाल पाटील चिखलोद खुर्द, प्रल्हाद पाटील मंगरूळ, रमेश पाटील म्हसवे, कुलदीप सरदार मोंढाळे प्र.अ., प्रभाकर पाटील रत्नापिंप्री,प्रदिप पा.चिखलोद बु.,वना पाटील चहुत्रे,सलतान वंजारी वडगांव प्र.ए., महिला पो.पा. नलीनी पाटील टोळी, ललीता पाटील पळासखेडेसिम, ज्योत्स्ना पाटील वडगाव, वैशाली पाटील मेहू,रूपाली पाटील जोगलखेडे, सुरेखा पाटील हिवरखेडे, ज्योती चौधरी बहादरपुर, देवचंद पाटील कराडी, प्रदीप पा.करमाड खु., रामपुसाद पाटील सावखेडेतुर्क, देवेंद्र पा.वंजारी खु., राजेंद्र मिस्तरी सार्वे, गौतम भालेराव होळपिंप्री, सागर नेतकर उंदिरखेडे, देवचंद पाटील कराडी,निंबा गांगुर्डे कोळपिंप्री, छोटू पाटील मोरफळ, बन्सिलाल पाटील सांगवी, किशोर निकाळजे राजवड, मनोज वानखेडे आंबापिंप्री, नामदेव सुर्यवंशी उडणीखालसा, पांडूरंग राठोड पोपटनगर, अमर वाघ मोरफळी, गोकुळ पा.मोहाडी, जयेश पा.कण्हेरे, संजय पाटील भोकरवाडी, भिला सोनवणे उडणीदिगर, शिवदास भिल धुळपिंप्री, रतीलाल भिल तरडी आदी पो.पा.उपस्थित होते.