पोलिस प्रशिक्षणार्थींचा गुरुवारी दीक्षांत सोहळा

0

धुळे। जिल्हा पोलिस प्रशिक्षण केंद्राच्यावतीने प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत संचलन सोहळ्याचे 10 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास विशेष पोलिस महानिरीक्षक विजयसिंह जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य चंद्रकांत गवळी यांनी पत्रकार परिषदेतून दिली. नव्याने पोलिस दलात प्रवेशकरणार्‍या शिपायांना प्रशिक्षण देण्यासाठी सन 2010 पासून प्रशिक्षण केंद्र धुळ्यात सुरु करण्यात आले आहे. एकूण 1250 नवप्रविष्ठ पोलिस प्रशक्षणार्थींनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. या प्रशिक्षणांतर्गत आंतरवर्ग अभ्यासक्रमादरम्यान कायद्याचे मुलभूत ज्ञान, गुन्हे तपास व प्रतिबंध, पोलिस संघटन, कायदा व सायबर गुन्हे, सुव्यवस्था, संगणक प्रशिक्षक व इत्यादी विषयतसेच बाह्यवर्ग प्रशिक्षणादरम्यान पद कवायत, शारीरिक व्यायाम,जमाव विसर्जन, कराटे, योगा, खेळ, विविध भाषा, फायरींग आदी विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य चंद्रकांत गवळी यांनी दिली.

तणाव दूर करण्यासाठी विपश्यनाचे आयोजन
प्रशिक्षणार्थींच्या ज्ञानात वृद्धी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. बदलती जीवनशैली व वाढत्यालोकसंख्येमुळे पोलिस दलावर वाढणारा तणाव दूर होवून आपले कर्तव्य दक्षतेने पूर्ण होण्यासाठी प्रशिक्षणार्थींकरीता विपश्यना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलभूत प्रशिक्षणादरम्यान पोलिस दलाचा कणा असलेली शिस्त पाळण्याबाबत विशेष लक्ष देण्यात आले. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, यवतमाळ, कोल्हापूर, गडचिरोली यासह विविध जिल्ह्यातील नव्याने भरती झालेल्या पोलिस शिपायांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणात कष्टकरी, श्रमीक, सर्वसामान्य कुटुंबातील पोलिस शिपाई असल्याने या दीक्षांत सोहळ्याला प्रशिक्षणार्थींचे कुटुंबिय देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती उपप्राचार्य शशीकांत महाजन यांनी दिली.