संसदीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल
पिंपरी : पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झालेत. त्यानिमित्त पोलिस फ्रेन्डस वेलफेअर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे यांच्या हस्ते पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी भावेश दाणी, अतुल गोसावी, शुभम चिंचवडे, अॅड. सुनील कड, युवराज चिंचवडे उपस्थित होते.
सर्वच पक्षात माणसे जोडून ठेवली
वेलफेअरचे अध्यक्ष चिंचवडे म्हणाले की, आज देशाच्या राजकारणात सर्वात उंचीवर असणारे व्यक्तीमत्व म्हणजे शरदचंद्र पवार साहेब आहेत. राजकारणात विविध पदावर काम करत असताना त्यांनी सर्वच पक्षात आपली माणसे जोडून ठेवली आहेत. म्हणूनच त्यांच्या सत्कारासाठी संपूर्ण देशातील सर्वच पक्षातील सर्वोच्च पदाधिकारी उपस्थित राहतात. यातूनच त्यांच्या कार्याची उंची दिसून येते. महाराष्ट्र आणि देशाचे राजकारण, समाजकारण, क्रीडा, साहित्य अशा प्रत्येकच क्षेत्रात शरदचंद्र पवार यांचे कार्य अभिमानास्पद आहे. या देशातील युवकांना त्यांचे विचार कायमच प्रेरणादायी ठरतात. त्यामुळेच पोलिस वेलफेअर असोसिएशनच्यावतीने पवार साहेबांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलिस फ्रेडस वेलफेअरच्या कार्याचे शरद पवार यांनी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.