पोलिस भरतीसाठी आलेल्या मुलांची बॅग चोरीला

0

जळगाव । राज्यात पोलिस भरती मोठ्या प्रमाणावर सुरू असून जिल्ह्यात देखील भरतीची प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी लातूर जिल्ह्यातून आलेल्या उमेदवाराचे नेरी नाकाजवळी चौधरी पेट्रोल पंपाजवळ अज्ञात व्यक्तीने सोबत असलेली बॅग चोरीला नेल्याची घटना 26 मार्च रोजी मध्यरात्री घडली. चोरलेली बॅग जिल्हा पेठ पोलिसांना मिळल्याने ती बॅग संबंधित मुलाला देण्यात आली आहे.

या घटनेबाबत अद्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल शिवाजी भोसले (वय-22) व सावता रघूविर माळी (वय-22) दोन्ही रा. वडजी ता. औसा जि. लातूर हे जळगाव येथे भरतीसाठी 25 मार्च रोजी शहरात आले होते. त्यांनी भरतीतील शारिरीक चाचणी पुर्ण केली असून आता लेखी परिक्षासाठी शहरातच नेरी नाका येथील चौधरी पेट्रोल पंपाजवळ राहण्यासाठी थांबले होते. 26 मार्च रोजी रात्री 11 वाजता पेट्रोल पंपावर दोघेजण झोपले. मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अमोल शिवाजी भोसले यांची बॅग चोरून नेली. या बॅगेत भरतीसाठी लागणारी सर्व शैक्षणिक कागदपत्रे, कपडे, पाकिट आणि 2300 रूपये रोख रक्कम ठेवली होती. आपली बॅग चोरीला गेल्यानंतर आजूबाजूला पाहणी केल्यानंतर त्यांना मिळून आली नाही. सकाळी ही बाब त्यांनी पेट्रोल पंप चालकाच्या लक्षात आणून दिले. दरम्रान चोरलेली बॅग जिल्हापेठ पोलिसांना मिळून आली.

कागदपत्रांमध्ये संपर्क मिळाला
दरम्यान, जिल्हापेठ पोलिसांना एका व्यक्तीने ही बॅग सापडल्याने त्यांनी सदरील बॅग पोलिसांच्या स्वाधिन केली. जिल्हा पेठ पोलिस कर्मचार्‍यांनी बॅगेची पाहणी करून कागदपत्रांमध्ये अमोल भोसले यांच्या घराच्या संपर्क क्रमाक मिळाला. त्यानुसार त्यांना घरच्याशी संपर्क साधून सदरील बॅग मिळून आल्याचे सांगितले. त्यानुसार अमोलच्या नातेवाईकांनी अमोलशी संपर्क साधून बॅग जिल्हा पेठला असल्याचे सांगितले. अमोल भोसले आणि सावता माळी यांनी जिल्हा पेठ पोलिसात धाव घेवून चौकशी करून ही बॅग आपलीच असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी सदरील बॅग अमोल भोसले यांच्या स्वाधीन केली.