जळगाव। पोलीस भरती होण्यासाठी बौद्धिक परिक्षम घेणे महत्वाचे असतेच परंतु त्यासोबत शारिरीक परिक्षम घेणे ही आवश्यक असते असे प्रतिपादन पोलिस उपनिरिक्षक छाया पाटील यांनी केले. शहरातील दिशा स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजीत पोलीस भरती प्रशिक्षण मोफत शिबिरात ह्या बोलत होत्या या प्रसंगी व्यासपिठावर दिशाचे सचांलक प्रा. वासुदेव पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सराव करा
पुढे बोलतांना छाया पाटील म्हणाल्या की, सध्या पोलिस भरतीकडे मुलांचा कल वाढला आहे. यात मुलींची संख्या लक्षनिय आहे. अनेक वेळा भरतीची तयारी केल्या नंतरही अवघ्या काही गुणांमुळे अनेकांची संधी हुकते यासाठी काही बाबींकडे लक्ष देणे आवश्यक असते. अनेक विद्यार्थी लेखी परिक्षेसाठी आवश्यक तयारी करतात मैदानी खेळांचा सराव देखील करतात. मात्र ते तंत्रशुद्ध पद्धतीने नसल्याने त्यांना पोलीस भरती पासून वंचित रहावे लागते. यासाठी मैदानी प्रकारात सर्व बाबींची परिपूर्ण माहिती घेवून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी सराव करावा. यश तुमचेच असेल असे त्यांनी नमुद केले. याप्रसंगी प्रा. वासुदेव पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या मोफत शिबिरात विद्यार्थ्यांची संख्या लक्षनिय होती.