पोलिस महासंचालकाचा ५० कोटीचा दावा

0

बंगळूरू : एआयएडीएमके नेत्या शशिकला यांना तुरूंगात व्हीआयपी दर्जाची वागणूक देण्याच्या प्रकरणात आणखी एक घडामोड झाली आहे. कर्नाटकचे पोलिस महासंचालक (तुरूंग) एचएन सत्यनारायण राव यांनी पोलिस उपमहासंचालक रूपा मोदगिल यांच्या विरोधात ५० कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला याहे.

रूपा यांनी महासंचालक राव यांच्या विरोधात आरोप निश्चित केले होते. शशिकला सध्या बेंगळूरूमधील परप्पान अग्रहार मध्यवर्ती तुरूंगात शिक्षा भोगीत आहेत. तुरूंगात व्हीआयपी दर्जाच्या सेवा मिळाव्यात म्हणून त्यांनी राव यांना दोन कोटीची लाच दिली असा आरोप रूपा यांनी केला होता. राव यांना या आरोपांनंतर सक्तीच्या रजेवर पाठवविण्यात आले असून रूपा यांची रस्ते सुरक्षा आणि वाहतूक आयुक्त म्हणून बदली केली आहे.