पोलिस मुख्यालयातील लिपीकाचा मृत्यू

0

जळगाव । पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले क्लर्क प्रकाश नारायण वाघ (वय-55) हे शनिवारी सकाळी पोलिस कवायत मैदानावर फिरत असतांना ते बेशूध्द पडले. त्यांना लागलीच मैदानावरील पोलिस कर्मचार्‍यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, हृदयविकाराच्या झटक्याने वाघ यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

प्रकाश नारायण वाघ यांची काही दिवसांपूर्वी नाशिक येथून जळगाव मुख्यालयात क्लर्क म्हणून बदली झाली होती. तर शनिवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमार पोलिस कवायत मैदानाजवळ असलेल्या जलतरण तलाव येथे वाघ हे ड्युटी बजवत होते. काही वेळानंतर प्रकाश वाघ हे पोलिस कवायत मैदानावर पायी पिरण्यासाठी गेले. पायी फिरत असतांना प्रकाश वाघ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते जलतरण तलावाजवळ असलेल्या पायर्‍यांजवळ बसले. त्यावेळी ते अचानक बेशूध्द पडून खाली पडले. मैदानावरील पोलिस कर्मचार्‍यांनी लागलीच त्या ठिकाणी धाव घेत डॉक्टरांना बोलवून तपासणी केली. प्रकृति चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी जिल्हा रूग्णालयात हलविण्याच्या सुचना दिल्यानंतर कर्मचार्‍यांनी वाघ यांना जिल्हा रूग्णालया उपचारार्थ दाखल केले. परंतू वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना तपासणीनंतर मृत घोषित केले. याप्रकरणी कमलेश भालचंद्र नगरकर यांच्या खबरीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.