तिघांविरोधात गुन्हा दाखल
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारदार व बोदवडचे पोलिस नाईक संदीप शांताराम वानखेडे हे शनिवारी कर्तव्यावर असताना संशयीत सुनील सरदारसिंग राजपूत यांनी बोदवड पोलिस ठाण्यातील अंमलदार कक्षात प्रवेश करीत माझ्या मुलाला मारहाण झाल्यानंतरही शोरूमवाल्यांची तक्रार का नोंदवत आहात? असे म्हणत अश्लील शब्दात शिविगाळ केली तसेच फिर्यादी यांची कॉलर पकडून त्यांची नेमप्लेट तोडण्यात आली, आता दाखवतो, तुमची नोकरी खातो म्हणत पोलिस कर्मचार्याच्या शासकीय कामकाजात अडथळा आणला. या प्रकरणी संदीप वानखेडे यांच्या फिर्यादीवरून संशयीत सुनील सरदारसिंग राजपूत, अक्षय सुनील राजपूत व शैला सुनील राजपूत (जंगीपुरा, ता.जामनेर) यांच्याविरोधात बोदवड पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.
Bodwad police station employee punched: case against three बोदवड : बोदवड पोलिस ठाण्यातील अंमलदारांच्या कक्षात धुडगूस घालून शिविगाळ करीत पोलिस कर्मचार्याची कॉलर पकडून नेमप्लेट तोडण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवार, 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने पोलिस वर्तुळातील मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी तिघांविरोधात बोदवड पोलिसात शासकीय कामकाजात अडथळा आणण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
हे देखील वाचा