जळगाव । आजचे विद्यार्थी भावी नागरिक होणार आहात. शाळेतील विषय आपण शिकतो. परंतू, समाजात वावरतांना आपण कसे वागले पाहिजे तसेच सामाजिक काही नियम आहेत ते कायदे आहेत ते आपणी शिकत नाही. ते आपण शिकले पाहिजे. पोलिस देखील डॉक्टरांप्रमाणे काम करतो. पोलिस सुध्दा साध्या गणवेशातील नागरिक आहेत. समाजात वावरतांना पोलिसांना कशी मदत करू शकतो. याबाबत विचार करायला हवे, बालक दिन हा शुभेच्छा व चॉकलेट खाणे नसून तर आजचे बालक हे उद्याचे पालक असून आपण जबाबदार नागरिक म्हणून समजातात वागले पाहिजे, असे पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना आपल्या भावना व्यक्त केल्या.
शहरातील 15 शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती
पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या संकल्पनेतून मंगळवारी मंगलम हॉल येथे विद्यार्थी व पोलीस सुसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातील पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर मंगलम हॉल येथे कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, डीवायएसपी रशिद तडवी, पोलीस निरीक्षक सुनील कुर्हाडे, विलास सोनवणे, बी.जी.रोहम, प्रविण वाडीले आदींची उपस्थिती होती. त्या पुर्वी विद्यार्थ्यांना पोलीस कामकाजाची वास्तविकता व माहिती समजावी याकरीता विद्यार्थ्यांचा समुह करीत शहरातील सर्व पोलीस स्टेशन, शहर वाहतुक शाख, पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस बिनतारी संदेश विभाग, पोलीस मुख्यालयातील शस्त्रगार, पोलीस मोटार परीवहन विभाग आदी विभागांची ओळख करुन देण्यात आली. यावेळी शहरातील 15 शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यावेळी पोलीसांचे कार्यावर आधारीत एक व्हीडीओ विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. विनोद अहिरे यांनी सूत्रसंचालन केले.
विविध विभागाची उत्सुकतेने विद्यार्थ्यांनी जाणून घेतली माहिती
नेहमी खाकी वर्दीतील पोलीस समोर आल्यावर वाटणारी भिती आता राहीली नसून पोलीसांचे खडतर असणारे कार्य, सायबर क्राइम पासून आपण घेणारी काळजी तर वाहतुकीचे नियंत्रण कक्षाद्वारे चालणारे काम यासह सर्वसामान्यांची कसे प्रश्न एक पोलीस कर्मचारी सोडवितो तर पोलीसांचे शस्त्र कसे असतात याची सर्व माहिती विद्यार्थ्यांनी मंगळवारी उत्सुकतेने जाणून घेतली. तर पोलीसांनीही एका मैत्रीच्या नात्याने हे विद्यार्थ्यांना समाजावून सांगितले. तसेच विविध विभागांची माहिती सुध्दा देण्यात आली.