रावेर। शहरातील चौघा तरुणांनी पोलिस कर्मचार्यास मारहाण केल्याची घटना 14 रोजी घडली. पोलिस कर्मचारी महेंद्र सुरवाडे हे स्टेशन रोडला गस्तीवर होते.
यावेळी काही तरुण रस्त्यावर फोटो काढत असताना सुरवाड़े यांनी बाजुला होण्यास सांगितले त्याचा राग आल्याने प्रमोद मेढ़े, सुनील शिरतुरे, राहुल गजरे, अजय मेढ़े यांनी सुरवाड़े यांना मारहाण केली. याबाबत सुरवाड़े यांच्या फिर्यादिवरुन गुन्हा दाखल करुन चौघांना अटक करण्यात आली आहे.