पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांचा गौरव

0

चाळीसगाव । शहरातील घाट रोड वरील उर्दू हायस्कुलच्या कंपाउंड लगत फोडलेल्या दुकानाचा व दरोड्याच्या उद्देशाने नाशिक येथून आलेल्या आरोपीना पिस्तूलसह अटक करणार्‍या चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक 2 अधिकारी व कर्मचार्‍यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक जळगाव यांनी गौरव केला असून त्यांना रोख रकमेसह प्रशंसापत्र देण्यात आले आहे.

सशास्त्रांसह दरोड्यांना केले अटक
शहरातील घाट रोड वरील अँग्लो उर्दू हायस्कुल लगत असंलेल्या किराणा दुकानाच्या मागील बाजूने भिंतीला बोगदा पाडून दुकानातील रोख रकमेसह इतर सामान चोरून नेणार्‍या आरोपींचा लागलीच तपास करून गुन्हा उघडकीस आणून त्यांना जेरबंद केले होते. नाशिक येथून दरोड्या साठी चाळीसगाव येथे आलेल्या आरोपींना धुळे रोड येथील हॉटेल मधून दरोड्याचे साहित्य व पिस्तूल सह अटक करणार्‍या चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आदिनाथ बुधवंत, स पो नि राजेंद्र रसेडे, पो. उ नि. विजयकुमार बोत्रे यांचे सह डीबी चे हवालदार शशिकांत पाटील पो कॉ योगेश मांडोळे, र्हाऊल पाटील, बाप्पू पाटील, नितीन पाटील, नरेंद्र नरवाडे, गोवर्धन बोरसे, संदीप जगताप, गोपाळ बेलदार, गोपाळ भोई, संदीप तहसीलदार यांना पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी बक्षीस देऊन प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले आहे.