पोलीस अधिकारी कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी

0

धुळे । गणेश विसर्जन दरम्यान भांडण मिटविण्यासाठी गेलेल्या सुमित मिस्तरीला काही ठोस कारण नसतांना सुडबुद्धीने मारहाण करुन गुन्हा दाखल प्रकरणाची चौकशी करुन संबंधीत पोलीस अधिकारीसह कर्मचार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी रामालय गृपतर्फे करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाला या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. 5 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी रात्री 11 ते 11.30 वाजेच्या सुमारास आग्रारोड पोलीस चौकीजवळ गणपती विसर्जन मिरवणुकीत काही युवकांचा वाद होत होता. यावेळी हा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या सुमित मिस्तरीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पानसरे व त्यांच्यासोबत असलेले मनोहर बडगुजरसह पाच ते सहा पोलिसांनी कुठलीही शहानिशा करतांना सुमित मिस्तरीला बेदम मारहाण केली.

अप्पर पोलीस अधीक्षकांनी स्विकारले निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी सुमितच्या गुप्तांगावर जोरात लाथा मारल्या. यावेळी त्याला गंभीर वेदना होत असतांना त्याची दखल घेतली नाही. उलट त्यांच्या आणि त्याचे वडीलाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात ते शहर पोलिसात गेले असता पोलिसांनी त्यांना अटक करुन मे.चिफ कोर्ट यांच्यासमोर उभे केले. यावेळी पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केली. त्यानुसार सुमितला आकस व सुड बुद्धीने मारहाण केल्याप्रकरणी संबंधीत अधिकारी व कर्मचार्‍याची चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी रामालय ग्रुपचे गणेशबापू मोरे, निरंजन करनकाळ, सुनिल चौधरी, प्रमोद चौधरी, चिंतामण ताकटे, मुकेश चौधरी, मुस्ताकशा गुलाबशा, विनोद थोरात, अ‍ॅड.चंद्रकांत चौधरी, योगेश चौधरी, बबनराव चौधरी, वसंतराव तावडे, देविदास वाडीले, भानुदास लोहार, प्रतिक कर्पे, योगेश चौधरी, अक्षय वराडे, युवराज वारुडे, वाल्केश चौधरी, नवाब बेग, संतोष खेडकर, शाम वानखेडे, सागर गवळी आदींनी केले आहे.