एरंडोल : एखद्या पोलीस अधिकार्याला एवढे प्रेम देणारे महाराष्ट्रातील एकमेव हे शहर असुन या ठिकाणची लोक खूपच भावनिक आहेत. त्यांनी दिलेल्या प्रेमाखातर मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहील असे भावनिक उद्गार एरंडोल येथील पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे यांनी त्यांच्या येथील पोलीस आराम कक्षात ठेवण्यात आलेल्या निरोप समारंभ प्रसंगी काढले. या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे हे खूपच भावनाविवश झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय पोलीस उपाधीक्षक रमेश पवार हे होते.
शहरातील सर्व पक्षीय मान्यवरांची उपस्थिती
यावेळी प्रथमच एरंडोल शहरात पोलीस विभागाच्या कर्मचार्याला शहरातील सर्व पक्षातील मान्यवर, कार्यकर्ते, समाजसेवक, कवी, लेखक, प्राध्यापक, राजकीय आजी माजी पदाधिकारी, शासकीय आजी माजी पदाधिकारी तसेच शहरातील तळागाळातील नागरिकांसह ते चहा टपरी धरकांपर्यंत लोक पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे यांना निरोप देण्यासाठी एकत्रित आले होते. यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी, प्रा.शिवाजी अहिराव, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, निवृत्त पोलीस निरीक्षक हिरामण कंखरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, रवींद्र पाटील, पत्रकार जावेद मुजावर, संदीप पाटील, कवी भीमराव सोनवणे, पोउनि विजया अलोणे यांनी मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाला सरकारी वकील रव.नवले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, रवींद्र महाजन, रमेश महाजन, प्रशांत महाजन, प्रा.मनोज पाटील, उपनगराध्यक्ष जाहिरोद्दिन शेख कासम, नगरसेवक योगेश महाजन, राजेंद्र शिंदे, प्रसाद दंडवते आदी असंख्य लोक हजर होते.
भावपूर्ण निरोप
यावेळी एरंडोल पो.स्टे.ला रुजू झालेले पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे यांच्या सारखेच प्रेम द्यावे असे सांगीतले. यावेळी पोलीस विभागातील उपस्थित कर्मचारी भावनिक झाले होते व उपस्थितांमध्ये पोलीस प्रशासन व सामान्य जनता यांच्यात राखलेल्या समन्वयाची हि पावती असुन खाकी बद्दल लोकांच्या मनातील गैरसमज अशा अधिकार्यांमुळे दूर होतो व शहरातील कायदा,सुव्यवस्था राखणे सोपे जाते अशी भवना होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन प्रा.वा.ना.आंधळे यांनी तर आभार पोलीस उपनिरीक्षक एम.एस.बैसाणे यांनी केले.