जळगाव । बाल निरीक्षण गृहातून 3 बालकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. या पाश्वभुमीवर पोलीस अधिक्षक डॉ.जालींधर सुपेकर यांनी सोमवारी 20 रोजी सकाळी निरीक्षण गृहास भेट देवून निरीक्षण गृहाची व परिसराची पाहणी केली तसेच तेथील अधिकार्यांसोबत बैठक घेवून सुरक्षे विषयी मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधीकारी सचिन सांगळे, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुबेर चावरे, महिला व बाल विकास अधिकारी आर.बी.काटकर, बालसुधार गृहाच्या अधिक्षक सारीका मेतकर आदी उपस्थित होते.
निरिक्षणगृह सुरक्षेची घेतली माहिती
पोलीस अधिक्षकांनी मुलांनी ज्या ठिकाणांचा वापर करुन पलायन केले त्या जागांची पाहणी केली. यानंतर डॉ.सुपेकर यांनी आर.बी.काटकर , सारीका मेतकर, एसडीपीओ सांगळे व जिल्हापेठचे पो.नि. चावरे यांच्यासोबत आठावा बैठक घेतली ही बैठक सुमारे 25 ते 30 मिनीटांची झाली. यात निरीक्षण गृहाच्या सुरक्षेच्या उपाय योजनांची माहिती घेवून पोलीस अधिक्षकांनी काही महत्वपुर्ण सुचना केल्या तसेच काटकर यांनी सुरक्षेच्या दृष्टीने काही मागण्या मांडल्या.
शेड काढण्याचे काम सुरू
डॉ.जालींदर सुपेकरांनी निरीक्षण गृहाच्या खोल्यांमध्येच शौचालय व स्वच्छतागृह असावे. मुलांना पळून जाण्याची संधी मिळणार नाही यासाठी जी ठिकाणी अशी स्थिती आहेत त्यांच्या पर्यंत त्यांना पोहचता येवू नये, जिन्याचे ग्रीलींग वाढवावे अशी उपाय योजना सुचविली आहे. ज्या समस्या असतील त्यांचे निस्सारण करा अशा सुचना केल्या आहेत. तर आढावा बैठकित निरीक्षण गृहाच्या अधिकार्यांनी सुरक्षेसाठी केवळ रात्रीच पोलीस कर्मचारी सुरक्षा रक्षक म्हणून उपलब्ध असून तीन शिप्ट मध्ये पोलीस कर्मचारी सुरक्षा रक्षक असावा. केअर टेकरच्या 2 जागा रिक्त असून त्या भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे असे सांगीतले. ज्या पत्रांवरुन उडी मारुन मुलांनी पलयान केले होते ती पत्रे 19 रोजी काढून टाकण्यात आली तसेच शेड काढून टाकण्याचे काम सुरू आहे.