४० हजार रुपयांचे दागिण्यांवर डल्ला
जळगाव :- औरंगाबाद येथे पुतणीच्या लग्नासाठी गेलेल्या नदिम अख्तरअली काझी (वय-46) यांचे भर दिवसा घर फोडून चोरट्यांनी 40 हजार रुपयांचे दागिणे लांबविल्याची घटना आरटीओ कार्यालयाजवळ आदर्शनगरात सोमवारी उघडकीस आली आहे. चोरी केल्यानंतर कंपाऊंड वरुन पळून जाणार्या चोरट्यांना शेजार्यांनी बघितले, अन् त्यानंतर चोरीचा प्रकार समोर आल्याची माहिती मिळाली आहे.
पुतणीच्या लग्लासाठी गेले होते औरंगाबाद
आदर्शनगरात आरटिओ कार्यालयाच्या शेजारील गल्लीत नदिम अख्तरअली काझी (वय-46) आई, पत्नी कुटूंबीयांसह वास्तव्याला आहेत. काझी कुटूंबीय पुतणीच्या लग्नासाठी 13 रोजी सकाळी 11 वाजता घरबंद करुन औरंगाबादसाठी रवाना झाले होते. यादरम्यान 15 रोजी भर दुपारी चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून ऐवज लांबविला. चोरी करुन भिंतीचे कुंपनावर उडी मारुन पसार होणारे चोरटे काझी यांच्या घरा समोरील रहिवासी प्रणिता भंडारी यांना दिसले. त्यांनी सायंकाळी हा प्रकार फोनवरुन भंडारी यांनी काझी यांच्या वहिनी आबेदा यांना कळविला.
पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळाला भेट
लग्न सोहळा अटोपून काझी कुटूंबीय सोमवारी जळगावी परतले. घरात प्रवेश केल्यावर त्यांना घरातील लाकडी कपाटातून साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. तसेच कपाटातील 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रासलेट, 5 ग्रॅम सोन्याचे टॉप्स, 5 ग्रॅम वजानाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या असा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे समोर आले. यानंतर नदीम काझी यांनी रामानंद पोलीस ठाणे गाठले. या तक्रारीवरुन 17 रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्यासह रामानंद पोलीस निरिक्षक तसेच कर्मचार्यांनी सोमवारी सायंकाळी पाहणी केली.