पोलीस अधीक्षक विरेश प्रभू ‘दिलखुलास’ कार्यक्रमात

0

मुंबई | माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण’ या विषयावर सोलापूर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विरेश प्रभू यांची मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दि. ९, १० व ११ ऑगस्ट रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. डॉ. लक्षराज सानप यांनी ही मुलाखत घेतली आहे

आषाढी एकादशीच्या पंढरपूर यात्रेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था चोख पार पाडण्यात आली. सोलापूरचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विरेश प्रभू यांनी ही यात्रा सुरळीतपणे पार पाडली. सोलापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच पंढरपूर यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेवर कशाप्रकारे नियंत्रण करण्यात आले याबाबतचीमाहिती श्री. प्रभू यांनी दिलखुलास या कार्यक्रमात दिली आहे.