पोलीस उपनिरीक्षकासह 5 जणांविरुध्द गुन्हा

0

वरणगाव। लग्नात हुंड्यापोटी मोटरसायकल सोन्याची चैन, अंगठी, पैसे घेवूनसुध्दा घर बांधण्यासाठी विवाहितेस माहेरून दोन लाख रुपयाची मागणी केली व शिवागाळ, मारहाण करून शारीरीक मानसीक त्रास दिल्यामुळे पोलीस उपनिरीक्षकासह 5 जणांविरूध्द वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रावण जवरे यांची मुलगी स्नेहा हिचा विवाह पोलिस निरीक्षक कौतीक सुरवाडे यांचा मुलगा शरद यांच्याशी 31 मे 2016 रोजी विवाह झाला होता. स्नेहाचे लग्न झाल्यानंतर 20 दिवसानंतर तुझ्या वडीलांनी आम्हाला लग्नात मान पान न दिला नाही. एक फुटके भांडे दिले नाही.

जबरदस्तीने केला गर्भपात
असे म्हणून लग्नात हुंड्यांपोटी मोटरसायकल सोन्याची चैन, अंगठी, पैसे घेवून सुद्धा घर बांधण्यासाठी दोन लाख रुपयाची मागणी केली. व शिवीगाळ, मारहाण करून शारिरिक मानसीक त्रास दिला. तसेच गरम पदार्थ व गोळ्या देवून गर्भपात केला आहे. म्हणून स्नेहा सुरवाडे (वय 21) यांच्या फिर्यादीवरुन पती शरद कौतिक सुरवाडे, सासरा कौतिक रामदास सुरवाडे (पीएसआय, धुळे) सासू सुनिता कौतिक सुरवाडे, नणंद पुनम विलास इंगळे, नणंद स्नेहल कौतीक सुरवाडे (सर्व राहणार जगदबां नगर, वरणगाव) यांच्या विरुध्द वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय निलेश वाघ, हेडकॉन्स्टेबल मझहर पठाण करीत आहे.