पोलीस कर्मचार्‍याकडून महिलेचा विनयभंग

0

जळगाव । महिलेची स्वाक्षरी घेण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचार्‍याने महिलेचा विनयंभग केल्याची घटना दि. 22 रोजी घडली होती. परंतु पोलिस कर्मचार्याविरुद्ध कोणतीच कारवाई न झाल्यामुळे पिडीत महिलेसह विश्‍वकर्मा सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिस अधिक्षकांची भेट घेवून घडलेल्या प्रकाराची माहिती देत निवेदन दिले. दरम्यान आज पिडीतेच्या फिर्यादीरुन कॉन्स्टेबल योगेश वाघ याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली असल्याने स्वाक्षरी घेण्यासाठी गेलेला रामानंद नगर पोलिस स्टेशनचा कर्मचारी योगेश वाघ याने महिलेशी गैरवर्तन करुन तीचा विनयभंग केल्याची घटना 22 रोजी घडली होती. मात्र आजपर्यंत देखील या कर्मचार्याविरुद्ध गुन्हा दाखल नसल्याने पीडित महिलेसह विश्‍वकर्मा सेनेचे अध्यक्ष राजेंद्र निकम, विश्‍वकर्मा वंशीय समाज संघटन अध्यक्ष योगेश व्हिरोळकर, महिला नारी शक्ती संघटना अध्यक्षा निताताई सांगोळे यांच्यासह समाज बांधवानी पोलिस अधिक्षक दत्ता शिंदे यांची भेट घेवून त्यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. यावेळी पोलिस अधिक्षक यांनी पिडीतेला रामानंद पोलिस स्टेशनला जावून तक्रार देण्याचे सांगितले. दरम्यान पिडीत महिलेच्या फिर्यादीवरुन रामानंद पोलिसात पोलिस कर्मचारी योगेश वाघ यांच्या विरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.