जळगाव : एकाच हॉटेलात मद्यप्राशन करत असतांना वादातून पोलीस मुख्यालयात कवायत निदेशक (डी.ई.) म्हणून कार्यरत असलेल्या दोन पोलिसांमध्ये पोलीस कवायत मैदानावरच जोरदार हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची दोन गुरुवारी जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्यांमध्ये एकच चर्चा होती. यात एक कर्मचारी बॉक्सर असल्याने दुसर्या कर्मचार्याच्या दुखापत झाली असून जखमी पोलिसावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण करणारे दोघेही पोलीस कर्मचार्यांना दोन दिवसापूर्वी भुसावळला पाठविण्यात आले होते. तेथून आल्यानंतर दोघांनी एकाच हॉटेलात मद्यप्राशन केले. याच ठिकाणी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. यातून दोघेही पोलीस मैदानावर आमने-सामने आले व दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. शिस्तीचे खाते समजले जाणार्या पोलीस दलात कर्मचार्यांकडूनच बेशिस्तपणा केला जात असल्याने सर्वत्र टीका होऊ लागली आहे. दरम्यान, या दोन्ही कर्मचार्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.