पोलीस कोठडी सुनावताच संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न

0

दरोड्याच्या प्रयत्नात एमआयडीसी पोलिसांनी केली अटक : स्वतः हाताने काचा फोडून दुखापतही करुन घेतली

जळगाव: एमआयडीसी पोलसांनी कोम्बींग ऑपरेशन राबवतांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मेहरुण तलाव परिसरात एकत्र येवून पांडेडेअरी चौकातील पेट्रोल पंपावर दरोड्याची योजना आखत असलेल्या 9 संशयीतांना पोलिस पथकाने घातक शस्त्रास्त्रांसह अटक केली. सर्व संशयीतांना जिल्हा न्यायालया समक्ष हजर केल्यावर त्यातील रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार मोनुसिंग बावरीने न्यायालयाच्या गॅलरीची काच फोडून संताप करत घरून अटक करुन आणुन खोट्या गुन्ह्यात अडकवत असल्याचा आरोप केल्याने एकच गोंधळ उडाला. अटकेतील संशयीतांना 10 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

पिस्तूल, चॉपर, टॉमी जप्त

संशयीतांना ताब्यात घेतल्यावर पथकाने त्यांची वाहनांच्या प्रकाशात ओळख पटवली, एकेक करुन ताब्यात घेतल्यावर अंगझडती घेण्यात आली. त्यापैकी मोहनसींग च्या कंबरेला गावठी पिस्तूल, मोनु जवळ धारदार चॉपर,रिजवान जवळ टॉमी, पवन जवळ काठी, फौजी सनीच्या कंबरेत चॉपर, रितेशच्या खिश्यात लाल मिरची पावडर, नायलॉन दोरी असा दरोड्याचा संपुर्ण सामान पोलिसांनी पंचनामा करुन जप्त केला.

पोलिसांच्या नावाने संताप अन् गोंधळ

अटकेतील संशयीतांना आज न्या. डी.बी.साठे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्व संशयीतांना 10 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. रंजना पाटिल यांनी कामकाज पाहिले. कोठडीची सुनावणी झाल्यावर न्यायालयाच्या गॅलरीत उभे असतांना मोनूसींग बावरी याने पोलिसांच्या नावाने लाखोली वाहत..संताप करुन गॅलरीच्या खिडकीतुन उडी मारुन आत्महत्त्येचा प्रयत्न केला, मात्र वेळीच पोलिसांनी पकडल्याने त्याने खिडकीवर ठोसा मारल्याने खिडकीची काच फुटून त्याचा हाताला मोठी जखम झाली. वेळीच पोलिसांनी त्याला आवर घालून वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हारुग्णालयात दाखल केले.

ऑपरेशमध्ये कोम्बींग दरोड्याच्या प्रयत्नात टोळी अटकेत

एमआयडीसी पोलिसांतर्फे काल रात्री हद्दीत कोम्बींग ऑपरेशन राबवण्यात आले. याच दरम्यान निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना गुप्त माहिती मिळाल्यावरुन त्यांनी पथकातील उपनिरीक्षक संदिप पाटिल, सहाय्यक फौजदार आनंदसींग पाटिल, अतुल वंजारी, रामकृष्ण पाटिल यांच्यासह सचीन चौधरी,गोविंदा पाटिल,नितीन पाटिल, अशोक सनगत अशांना बोलावून माहिती सांगीतली. त्यानूसार दोन वेगवेगळे पथके तयार करुन मेहरुण तलाव परिसरातील जैन उद्योगाच्या जागेजवळ सापळा लावण्यात आला होता. या ठिकाणी अंधारात आठ-दहा जणांचे टोळके दरोडा मोहिमेची योजना आखुन एकमेकांस जबाबदारी निश्‍चीत करुन निघण्याच्या तयारीत असतांनाच पोलिसांच्या दोघा पथकांनी घेराव घालून संशयीतांवर झडप घातली. त्यात रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार मोहनसींग जगदीशसींग बावरी(वय-19),मोनुसींग जगदीशसिंग बावरी(वय-21),रिजवान ऊर्फ काल्या शेख गयासोद्दिन(वय-21),पवन ऊर्फ घातक आनंदा सोनवणे(वय-22,रामेश्‍वर कॉलनी),सनी ऊर्फ फौजी बालकिशन जाधव(वय-22 नागसेन नगर),रितेश ऊर्फ चिच्या कृष्णा शिंदे(वय-19),खुशाल ऊर्फ काल्या बाळू मराठे(वय-24), टपु शेख सलीम ऊर्फ बहिर्‍या(वय-22),गुरजीतसींग सुजानसिंग बावरी(वय-20) अशा नऊ संशयीतांना अटक करण्यात आली.