थेरगाव : भर रस्त्यावर दारुच्या नशेत अश्लिल चाळे करत असलेल्या इसमाला पोलिसांनी थेरगाव पोलीस चौकीत नेले असता तेथे त्याने स्वतःचेच कपडे फाडत भिंतीवर डोके आपटले. एवढे करून तो शांत राहीला नाही तर त्याने नशेत थेट पोलिसाचीच कॉलर पकडली. हा प्रकार रविवारी (दि. 9) रात्री नऊच्या सुमारास घडला. अतुल विजयकुमार गाडवे (वय 36, रा.थेरगाव) असे आरोपीचे नाव आहे. पोलिस नाईक अभिजीत बाळू यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्त घालत असताना थेरगाव गावठाण परिसरात एक व्यक्ती वेंगसकर स्टेडीयमजवळ चार चाकीमध्ये (एमएच 12 / पीक्यू 0774) मध्ये एका अज्ञात महिलेबरोबर अश्लिल चाळे करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली. यावेळी त्याने दारुच्या नशेत पोलिसांसोबत हुज्जत घातली. पोलिसांनी त्याला थेरगाव पोलीस चौकीत नेले. तेथे त्याने पोलिसांनाच तुम्ही महिलांना छेडता काय असे म्हणत पोलिस नाईक अभिजीत बाळू यांची कॉलर पकडली.