जळगाव । नशेचेपान खाऊ घालून पाच वर्षे बलात्कार करणारा पोलीस कर्मचारी परवेझ शेख आणि त्याचा पिता फौजदार रईस शेख यांनी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रविवारी सकाळी 11 वाजता जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात हजेरी लावली. यानंतर परवेझ शेख याची वैद्यकीय तपासणी देखील त्यानंतर करण्यात आली.
नशेचे पान खाऊ घालून पाच वर्षे तरूणीवर पोलिस कर्मचारी परवेझ शेख याने बलात्कार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पुत्राला मदतीसाठी पिता फौजदार रईस शेख यांचाही हात असल्याचा समोर आल्यानंतर दोघा पिता-पुत्रांविरूध्द जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही फरार झाले होते. दरम्यान, दोन्ही पिता-पुत्राने अटकपूर्व मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर काम होवून दोघांना न्यायाधीश के. बी. अग्रवाल यांनी प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर 29 जूनपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन दिला आहे. 25 जून रोजी 10 ते वाजेदरम्यान जिल्हापेठ पोलिस ठाण्यात हजर राहण्याची अट त्यांना घालण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रविवारी 25 रोजी सकाळी 11 वाजताच दोन्ही पिता-पुत्रांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात येवून हजेरी लावली. यानंतर पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख व डिबी कर्मचार्यांच्या निगराणीत परवेझ शेख याला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयाने नेण्यात येवून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.