जळगाव : समता नगरातील अल्पवयीन मुलीला त्यांच्याच परिसरातील मुलाने 26 नोव्हेंबर रोजी लग्नाचे आमीष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात 27 नोव्हेंबर रोजी गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र पोलिस योग्य शोध नसल्याचा आरोप करीत मुलीच्या आई, वडीलांनी गुरूवारी दुपारी 4 वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या समोर पेट्रोलची बाटली घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर पोलिसांनी मुलाच्या आई, वडीलांना ताब्यात घेतले. तसेच पोलीसांनी मुलीच्या आई-वडीलांची समजूत घातली.
समतानगरातील शब्बीर अजीम खाटीक (वय 44) यांची 17 वर्षीय मुलगी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता घरातून काहीही न सांगता निघून गेली. त्या विषयी 27 नोव्हेंबर रोजी खाटीक यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश प्रकाश तायडे आणि त्याच्या दोन मित्रांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र या गुन्ह्याचा तपास पोलिस योग्य पद्धतीने करीत नसल्याचा आरोप शब्बीर खाटीक यांनी केला. त्यानंतर खाटीक हे पत्नीसह हातात पेट्रोलची बाटली घेवून पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून बसले. पोलीसांनी त्यांची विचारपूस केल्यानंतर मुलगीला पळवून नेले असून योग्य तो तपास होत नसल्याचे खाटीक यांनी सांगून त्यांनी सिमेंटच्या गोंटीत पाय अडकवून अंगावर पेट्रोल टाकण्याचा इशारा दिला. व मुलास अटक करत नसतील त्याच्या आई-वडीलांना ताब्यात घेवून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
आत्मदहनाची धमकी दिल्यावर दोघे ताब्यात…
शब्बीर खाटीक हे कुटुंबियांसह गुरूवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलिस ठाण्यात आले. त्या ठिकाणी त्यांनी पेट्रोलची बाटली घेऊन अविनाश तायडेच्या कुटुंबियांना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांची तारांबळ उडाली. त्यांनी या प्रकरणी प्रकाश सोनू तायडे (वय 51) प्रमिला प्रकाश तायडे (वय 45) यांना गुरूवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची चौकशी केली. मात्र त्यांच्याही संपर्कात नसल्याचे समोर आले.