मुंबई – करोनामुळे ओढवलेल्या संकटाच्या काळात पोलीस, नर्स आणि डॉक्टर जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहेत. कोरोना व्हायरसची वाढणारी संख्या देश आणि राज्यासाठी चिंतेचा विषय बनली असताना काही घृणास्पद प्रकार समोर येत आहेत. मरकजमध्ये जो प्रकार घडला, अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे, यांना कसली ट्रीटमेंट देताय तुम्ही? या लोकांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल, किंवा काही कारस्थान वाटत असेल तर यांना जगवायचे कशाला? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला. तसेच निवडणुकीच्या कुणाला मतदान करावे सांगायला येणारे मुल्ला मौलवी आहेत कुठे? अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली.
त्यांच्या निवासस्थानी झालेल्या राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितले की, लॉकडाऊन पाळा, हे प्रकरण वाढले तर लॉकडाऊन वाढेल, त्यामुळे यंत्रणेवर ताण येईल, कर मिळणार नाही, उद्योग बंद राहतील, मंदी येईल, हे सगळे तुमच्या एका चुकीने होईल. त्याचसोबत भाज्यांवर थुंकणारे, नर्ससमोर नग्न होणारे यासारख्यांना फोडून काढले पाहिजे, त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले पाहिजेत. नुसता केसेस टाकून उपयोग नाही. कोरोना पसरवण्याचे विकृत चाळे करण्यार्यांना गोळ्या घाला. लॉकडाऊन थोड्या दिवसांसाठी आहे, नंतर आम्ही आहोतच, आक्षेपार्ह वागणार्यांना फोडून काढलं पाहिजे असा इशारा राज यांनी दिला. पंतप्रधानांनी दिवे लावण्यास सांगितले आहे. लोक काळोख करतीलही, नाही तरी घरात बसून काय करायचे आहे. श्रद्धा किंवा अंधश्रद्धेचा विषय असेल, पण त्याच्याने काही होणार असेल तर त्याने परिणाम होऊ देत. पण नुसते दिवे घालवून, मेणबत्त्या पेटवून, टॉर्च लावून याऐवजी पंतप्रधानांच्या भाषणात आशेचा किरण जरी दिसला असता तरी लोकांना समाधान वाटले असते, असे सांगत त्यांनी पंतप्रधान मोदींवरही टीका केली.