पिंपरी – पोलीस नागरिक मित्र संस्थेतर्फे मार्च 2018 ते मार्च 2019 वर्षासाठी विभाग प्रमुख व संपर्कप्रमुख यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष बाबूराव फडतरे, सचिव राहुल श्रीवास्तव व इतर कार्यकारिणी सदस्यांकडून ही निवड करण्यात आली. त्यानुसार बाळासाहेब साळुंखे (निगडी), विन्सेट लोबो (प्राधिकरण), सतीश सावंत (रूपीनगर), विनीता आंबेरकर (यमुनानगर), विमल गायकवाड (आकुर्डी गावठाण) ज्ञानप्रकाश शर्मा (आकुर्डी), मेघना आंब्रे (साने चौक), सोमनाथ विरकर (चिंचवडगाव), विशाल तरस (देहुरोड), नंदा करे (शाहूनगर), सिराज पुनावाला (बंडगार्डन), प्रमिला राऊत (चाकण) यांची विभाग प्रमुख म्हणून निवड झाली आहे. सुभाष जोशी (निगडी), शोभा मंत्रे (यमुनानगर), नेहा साठे (आकुर्डी), सचिन पवार (देहुरोड), राकेश सायकर (चिंचवडगाव) यांची संपर्कप्रमुख या पदावर निवड करण्यात आली आहे.
तसेच ज्या सदस्यांचे ओळखपत्र 31 डिसेंबर 2017 ला बाद झाले आहे, त्यांनी बाबूराव फडतरे (9822848274) व राहुल श्रीवास्तव (8329170473) यांच्याशी संपर्क करून ओळखपत्र नूतनीकरण करून घेणे. ज्यांचे सदस्यपद बाद झालेले आहे, त्यांनी संस्थेचे ओळखपत्र व जर्किन (पोषाख) व पोलीस नागरिक मित्र नावाचा वापर करू नये. तसे आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.