पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

1

पिंपरी : पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. हे पदक त्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईत राज्यपाल भवनात आयोजित सोहळ्यात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहे.

यापूर्वी 600 पुरस्कारांनी गौरव
विवेक मुगळीकर हे 1992 साली पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यांच्या आत्तापर्यंतच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये 15 पोलीस ठाण्यांमध्ये सेवा बजावली आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना 600 विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांची सर्व कामगिरी पाहता त्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी हे विशेष राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. मुगळीकर यांच्या प्रमाणेच पुण्यातील लोणीकंदचे पोलीस निरीक्षक शहाजीराव बाजीराव पाटील, पुणे मुख्यालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार दौलत माने, सिंहगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार कैलास शंकर मोहोळ, एसआरपीएफचे सहाय्यक पोलीस फौजदार सदाशिव प्रभू शिंदे यांनाही हे पदक जाहीर झाले आहे.