पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचा सत्कार

0

वाघोली : पुणे जिल्हा ग्रामीण मधील सर्वात मोठे समजले जाणारे लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना गुणवत्तापूर्ण सेवाबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले; त्यानिमित्त भाजपचे हवेली तालुका अध्यक्ष गणेश कुटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

सर्जेराव पाटील यांची पोलिस विभागात 1991ला उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. नवी मुंबईतील पोलीस आयुक्तालय, तुर्भे पोलीस ठाणे त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभाग, खंडणी विरोधी पथक, विशेष सुरक्षा विभाग, रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस ठाणे, हिंगोली जिल्ह्यातील वसमत पोलीस ठाणे, पुणे जिल्ह्यातील बारामती शहर पोलिस ठाणे आणि लोणीकंद पोलीस ठाणे या ठिकाणी उल्लेखनीय कार्य केले. या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले.