पोलीस पाटलांच्या मागण्यांसाठी आमदारांना साकडे

0

चाळीसगाव । राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध प्रलंबित मागण्याच्या पाठपुराव्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेच्या शिष्टमंडळाने आमदार उन्मेश पाटील यांना सोमवार 10 जुलै 2017 रोजी भेटुन निवेदनाद्वारे साकडे घातले. निवेदनात प्रामुख्याने पोलीस पाटील यांना दरमहा 7500 रुपये मानधन मळावे. नुतनीकरणाची पध्दत कायमस्वरुपी बंद करावी. शासनातर्फै दोन लाखाचा विमा उतरवावा. अनुकंपा तत्वावर पोलीस पाटलांच्या मुलांना सामावून घ्यावे. निवृतीचे वय 65 वर्षे करावे. उत्कृष्ट कार्य करणार्‍या पोलीस पाटलांना राज्यपाल पुरस्कार घोषीत करावा. आदी प्रलंबित मागण्यांचा समावेश आहे.

यांनी घेतली आमदारांची भेट
तालुकाअध्यक्ष विनायक मांडोळे, उपाध्यक्ष संजय साळंखे, सचिव भागवत सुर्यवंशी, सहसचिव भिमराव पाटील, योगेश महाजन, सदस्य राजेंद्र माळी, रामकृष्ण माळी, हेमराज पाटील,सारिका शिंदे, शारदा राजपुत, अर्चना मोरे व पदाधिकरी उपस्थित होते. संघटनेच्या पदाधिकार्‍यांना लवकरच याबाबत मुख्यमंत्री यांची मिटींग लावून मागण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन आ. उन्मेश पाटील यांनी दिले.