पोलीस पाटीलांना एक दिवसीय प्रशिक्षन

( नव्याने नियुक्त झालेल्या व जुने पोलीस पाटीलांचा कार्यशाळेत समावेश )

वरणगांव : प्रतिनिधी

नव्यानेच नियुक्त झालेल्या व जुने कार्यरत असलेले पोलीस पाटील यांच्यासाठी जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार रविवारी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस पाटील यांची कार्यशाळा भुसावळ येथे होणार आहे .

जिल्हाभरात नुकतेच गावनिहाय पोलीस पाटील पदाची परिक्षा उत्तीर्ण झालेल्या नविन पोलीस पाटील यांना त्यांचे कार्यप्रणाली बाबत योग्य असे मार्गदर्शन व्हावे यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार भुसावळ विभागातील भुसावळ, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील कार्यरत असलेले जुने पोलीस पाटील व नवनियुक्त पोलीस पाटील यांची एक दिवसीय कार्यशाळा रविवार दि . १७ रोजी सकाळी १० वाजता सुरु होणार आहे . या कार्यशाळेला भुसावळ, मुक्ताईनगर व बोदवड विभागाचे पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी, प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक, तहसिलदार मार्गदर्शन करणार असुन या कार्यशाळेला सर्व पोलीस पाटील यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .