दीपस्तंभ तर्फे मार्गदर्शन
जळगाव : पोलीस प्रशासनात सेवेची उत्तम संधी आहे, उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीला आत्मविश्वासाने सामोरे जा.यश तुमचेच आहे. असे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी केले. दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्र आयोजित पोलीस उपनिरीक्षक मुलाखत मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर दीपस्तंभ चे संस्थापक यजुर्वेन्द्र महाजन, संचालक जयदीप पाटील उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मुलाखत प्रक्रिया द्वारे व्यक्तिमत्व तपासले जाते, मुलाखत देताना आपल्या ज्ञानाचा कस लागतो, जे माहिती आहे ते स्पष्ट व मोजक्या शब्दात मांडा परंतु जे माहिती नाही त्याबद्दल उत्तरे देऊ नका. पोलीस विभागात कार्य करताना सामान्य जनतेच्या सेवेचा आनंद मिळतो. या प्रसंगी पोलीस दलाची रचना, श्रेणी, विविध कायदे,पोलीस स्टेशन ची रचना व कार्यपद्धती,भविष्यातील पोलिस दलातील संधी याबाबतीत श्री शिंदे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच भावी फौजदारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. याप्रसंगी देवल पाटील,महेंद्र पाटील उपस्थित होते.