पोलीस फ्रेंडस् वेलफेअरतर्फे शहिदांना श्रद्धांजली

0

पिंपरी-चिंचवड : पोलीस फ्रेंडस् वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य तर्फे 26/11 मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील जवान, पोलीस व नागरिकांना चिंचवडगाव येथील चाफेकर चौक येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी राष्ट्रपती पारितोषिक विजेते, कसाबला फाशी प्रकरणी विशेष भूमिका पार पाडलेले जेल सुभेदार दिलीप पाटील, महाराष्ट्र राज्य पोलीस संघटनेच्या प्रथम अध्यक्षा प्रभावती गणपतराव भोसले, सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडुरके, चिंचवड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पाटील, कॅप्टन दादाराव म्हेत्रे, नगरसेवक राजेंद्र गावडे, नगरसेवक सुरेश भोईर, नगरसेवक सचिन चिंचवडे, नगरसेवक तुषार कामठे, नगरसेवक अभिषेक बारणे, नगरसेविका अनुराधा गोरखे, अश्‍विनी चिंचवडे, अपर्णा डोके, राष्ट्रीय सैनिक संस्था, महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रताप भोसले सालासर हनुमान प्रचार समितीचे राजेंद्र चौधरी, महिपाल जांगीड, असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, कार्याध्यक्ष गोपाल बिरारी, पिंपरी-चिंचवड शहर व्यापारी आघाडी अध्यक्ष भावेश दाणी, लक्ष्य गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष बालाजी जाधव, डॉ. आशिष सोलंकी, योगेश चिंचवडे, शुभम चिंचवडे, बिभीषण चौधरी, सुभाष मालुसरे आदींनी श्रद्धांजली वाहिली. सूत्रसंचलन शुभांगी सरोटे यांनी केले.