पिंपरी : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकर्यांना पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनतर्फे निगडी येथे बिस्किट, वाटप करण्यात आले. तसेच 55 कार्यकर्त्यांनी पोलीस मित्र म्हणुन निगडी येथे बंदोबस्ताला व वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी मदत केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे,कार्याध्यक्ष गोपाल बिरारी, उपाध्यक्ष अतुल राऊत, हरिष आप्पा मोरे, अमोल गाडेकर, युवराज चिंचवडे, शुभम चिंचवडे,तेजस खेडेकर, मयुरेश मडके, अक्षय पवार, अक्षय इंदलकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.