एरंडोल खून खटल्यात कामकाज सुरू
जळगाव: एरंडोल येथील उमेश ऊर्फ खंडू पाटिल खुन खटल्याला गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरवात झाली असून फिर्यादी प्रा.मनोज पाटिल यांची साक्ष नोंदवण्यात आली. मुख्यालयाच्या सशस्त्र पोलिसांच्या तुकडीच्या बंदोबस्तात माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, पंकज नेरकर यांच्यासह सर्व संशयीत न्या. आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात हजर होते. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. केतन ढाके यांनी फिर्यादी प्रा.मनोज पाटिल यांची सरतपासणी नोंदवुन घेतली. त्यात गुन्ह्याचा संपुर्ण घटनाक्रम श्री महाजन यांनी न्यायालयात मांडला. यावेळी संशयीतांची ओळख घेण्यात येवुन तक्रारदार प्रा.मनोज पाटिल यांनी प्रत्येक संशयीताला न्यायलाया समक्ष ओळखले.
घटनेची कथन केली हकीकत
सरतापासणीत मनोज पाटिल यांनी सांगीतले की, घटनेच्या दिवशी 4 सप्टेंबर 2018 रोजी कबड्डी स्पर्धा सुरु असतांना संशयीत पंकज नेरकर याने सामना बघण्यासाठी आलेल्या विद्यार्थींनीच्या कंबरेवर थाप मारुन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला, क्रीडा शिक्षण म्हणुन जबाबदारी माजी असल्याने, मी, तेव्हा पंकज नेरकरला रागावले असता त्याने शिवीगाळ करुन धमकी दिली. नंतर 6 सप्टेंबर 2018 रोजी 8:30 ते 9 वाजेच्या सुमारास संशयीत आरोपींनी घरावर दगडफे करुन हल्ला चढवला. दगडफेकी बाबत माजी नगराध्यक्ष महाजन यांना विचारणा करण्यासाठी गेले असतांना आबाजी घरुनाथ पाटिल, उमेश ऊर्फ खंडू अशोक पाटिल यांच्यावर संशयीतांनी धारदार चाकू, लोखंडी रॉडने हल्ला चढवला. त्यात उमेश पाटील याला गंभीर दुखापत होवून तो उपचार सुरु असतांन 7 रोजी मयत झाला.
सर्व नऊ संशयीत हजर – गेल्या तारखेला 29 रोजी प्रमुख दोन संशयीत माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, पंकज नेरकर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल असल्याने न्यायालयात हजर राहु शकले नव्हते. न्यायालयाने या प्रकरणी कारागृह अधिक्षक आणि अधिकार्यांना धारेवर धरत खडसावले होते. मुख्यालयातील सशस्त्र गार्डसह पोलिस अधीकार्यांनी पंकज नेरकर, दशरथ महाजन, पवन महाजन, भरत महाजन, राहुल महाजन, चेतन पाटिल, धीरज पाटिल, रितेश महाजन अशा सर्व नऊ संशयीतांना न्यायालयात हजर करण्यात आले.