पोलीस भरती प्रक्रियेत इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर ; उमेदवारासह दोघांविरुद्ध गुन्हा

0
जळगावातील प्रकार ; औरंगाबाद जिल्ह्यातील संशयीताला अटक
जळगाव :- जिल्हा पोलीस दलात सुरू असलेल्या भरती प्रक्रियेदरम्यान 19 रोजी झालेल्या लेखी परीक्षेत मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्यास मनाई असतांना औरंगाबाद जिल्ह्यातील उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक उपकरण खांद्याला लपवून आणल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला.
याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक काशिराम रत्नपारखी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मदन डेडवाल व त्याचा साथीदार रतन बहुरे यांच्याविरूध्द जिल्हा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.