पोलीस मित्रांमुळे शहरातील अप्रिय घटनांना बसणार आळा

0

भुसावळ। पोलीसमित्रांमुळे अप्रिय घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून त्यामुळे जनतेतही पोलिसांविषयी विश्‍वास वाढण्यास मदत होईल, असा आशावाद बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी येथे व्यक्त
केला.

शनिवारी सायंकाळी यावल रोडवरील जुन्या तहसील कार्यालयात पोलीस मित्रांची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. सरोदे म्हणाले की, पोलीस मित्रांचे काम केवळ सण-उत्सवापुरताच आता मर्यादीत राहणार नसून ज्या-ज्या भागात चोर्‍या-घरफोड्या होतात तेथे ते गटा-गटाने गस्त घालू शकतात. पोलीस अ‍ॅप्सच्या माध्यमातून नोंदवलेल्या तक्रारीची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना प्राप्त होणार असून तातडीने लागलीच दखल घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यशस्वितेसाठी छोटू वैद्य, बाळकृष्ण पाटील, प्रमोद पाटील, राजेश बोदडे, नंदू सोनवणे आदींनी सहकार्य केले.